तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. निलेश सागर तर सचिवपदी डॉ. प्रशांत वळवी यांची सर्वानुमते निवड
नूतन अध्यक्ष डॉ. निलेश सागर
तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ.निलेश सागर तर सचिव म्हणून डॉ.प्रशांत वळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सचिव डॉ. प्रशांत वळवी
तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात डॉक्टर असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न झाली. त्यात नूतन पदाधिकारी निवड करण्यात आले. सदर पदाधिकाऱ्यांची निवड वार्षिक आहे. मावळते अध्यक्ष डॉ अशोक पाटील हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी गेल्या वर्षभरात असोसिएशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. भूषण मगरे व डॉ. प्रितेश चौधरी तर खजिनदार म्हणून डॉ.सागर पाटील यांचीही निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नूतन अध्यक्ष डॉ.निलेश सागर यांनी वर्षभरात असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबीर, विविध सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याच्या मानस व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.योगेश्वर चौधरी, डॉ.जगदीश मगरे,डॉ.सूर्यकांत पंजराळे, डॉ.शैलेश पाटील यांचेसह सुमारे ६०चे वर डॉक्टर्स सदस्य उपस्थित होते. तळोदा शहरात सुमारे पन्नासचेवर डॉक्टर्स रुग्णसेवा करीत आहेत. डॉ.निलेश सागर व नूतन पदाधिकारी यांचे स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments