तळोदा महाविद्यालयात समुपदेशन कार्यशाळा संपन्न
तळोदा :- प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) यांच्या सौजन्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास यांच्या संयुक्त विद्यमाने "मुलां-मुलींसाठी व्यापक समुपदेशन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित माळी तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बामखेडा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व कबचौ उमवि, जळगाव चे अधिसभा सदस्य डॉ. एच. एम. पाटील हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन ट्रस्टचे कोषाध्यक्ष लक्ष्मण माळी व समाजकल्याण महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उषा वसावे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील यांनी "विवाहपूर्व समुपदेशन" या विषयावर तर दुसऱ्या सत्रात शिरपूर, शिंदखेडा व दोंडाईचा येथील जय लक्ष्मी सुपर मार्केटचे मालक रोहित भोजवानी यांनी "करिअर कौन्सिलिंग" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तिसऱ्या सत्रात एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष गिरीश बडगुजर यांनी "मानसिक आणि किशोरवयीन लैंगिक आरोग्य" या विषयावर तर शिरपूर येथील आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ते रजनीशची ब्रह्मभट यांनी "मानसिक समस्या" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. हेमंत दलाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक तथा महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. स्वप्निल वाणी यांनी तर आभार प्रदर्शन सह-समन्वयक प्रा. डॉ. मुकेश जावरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे सह-समन्वयक प्रा. डॉ. आर. डी. मोरे, डॉ. एस. आर. गोसावी, डॉ. जे. एन. शिंदे, डॉ. एस. आर. चव्हाण, डॉ. पराग तट्टे, प्रा. पंकज सोनवणे, मनीष कलाल, पवन शेलकर, महेंद्र सामुद्रे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments