Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन

पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी

 शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन

           शहादा तालुक्यातील कुसुमवाडा प्रा.आ.केंद्र कुसुमवाडा अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंप्राणी येथील २०२२ यावर्षात सुमारे ४८ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन व तात्काळ नियुक्ती होऊन आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करणे करिता मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल  यांनी केली. नंदुरबार आमदार कार्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. असता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येऊन त्वरित आरोग्य उप केंद्र सुरु करण्यात येईल असे सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार आमश्या पाडवी हेही उपस्थित होते.

                      महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असतांना  नंदुरबार येथील आमदार कार्यालयात शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले की,प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा ता.शहादा अंतर्गत येणारे गांव पिंप्राणी येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार मार्फत २०२२ साली सुमारे ४८ लाख रुपये खर्च करुन आरोग्य उप केंद्रासाठी इमारतीचे  बांधकाम पुर्ण होऊन ३ वर्ष झालेली आहेत.परंतु सदर उप केंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने लाखो रुपये खर्च करुनही आरोग्य उप केंद्रासाठी बांधण्यात आलेली इमारत सध्या स्थितीत रिकामी पडलेली आहे.

याबाबत या आगोदर दिनांक ०५/०१/२०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना सातपुडा विकास संघर्ष समिती मार्फत पिंप्राणी येथील आरोग्य उप केंद्र तात्काळ सुरु करणे बाबत निवेदन देत मागणी करण्यात आली होती.परंतु अद्याप पावेतो पिंप्राणी येथील आरोग्य उप केंद्रसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळाली नसल्याने सदर आरोग्य उप केंद्र कार्यान्वित झालेले नाही.

 सदर आरोग्य उपकेंद्रच्या जवळपास असलेलं गावे ही शंभर टक्के आदिवासी समाजाची आहेत.त्यामुळे आरोग्याचा सुविधा शंभर टक्के आदिवासी समाजाच्या स्थानिक जनतेसाठी होणार आहे.पिंप्राणीसह आजूबाजूची गावातील बहुतांश जनता ही दारिद्र्य रेषे खालील असुन मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे आहेत.पिंप्राणी हे गांव हे सातपुडा पर्वतातील डोंगरावर आहे.सध्या स्थितीत आरोग्याच्या सुविधेसाठी ६/७ किलोमीटर वर असलेल्या कुसुमवाडा येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे.

पिंप्राणी ता.शहादा येथील आरोग्य उपकेंद्राला तात्काळ मंजुरी मिळून उपकेंद्रला आवश्यक असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळणेसह नियुक्ती झाल्यास गरीब जनतेला स्थानिक ठिकाणी आरोग्याचा सुविधा मिळू शकणार आहेत.

तरी खालील प्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी देवून तात्काळ नियुक्त करणे आवश्यक आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी- १ पद (C.H.O.)२)आरोग्य सेवक महिला-२ पद (A.N.M.)

आरोग्य सेवक पुरुष -१पद (M.P.W.)४)अर्ध वेळ महिला उपस्थिती-१पद (P.T.L.A.)

  तरी आपल्या स्तरावरून म.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जिल्हा परिषद नंदुरबार यांना योग्य ते  निर्देश अथवा आदेशित करुन वरील प्रमाणे पिंप्राणी ता.शहादा येथील उपकेंद्राला मंजुरी सहित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी देवून व त्वरित नियुक्ती करुन आरोग्य उपकेंद्र सर्व सुविधेसह कार्यान्वित करावे ही मागणी केली असता,आरोग्य मंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येऊन त्वरित आरोग्य उप केंद्र सुरु करण्यात येईल असे सांगितले.

निवेदनावर शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह  माजी नगर सेवक सुपडू खेडकर, युवा सेना उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, संतोष चौधरी, जयसिंग ठाकरे, लक्ष्मण पवार, मनोज पाथरवट, गणेश माळी, विजय गायकवाड यांच्या सह्या असुन यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments