सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त अभिवादन
तळोदा : शहरातील संत सावता माळी भावन येथे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. महात्मा फुले यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व विषमतेविरुद्ध दिलेल्या लढ्याची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
या कार्यक्रमाला सत्यशोधक समाज संघाचे विश्वस्त डॉ. डी. बी. शेंडे, माळी समाज अध्यक्ष अनिल पुंडलिक माळी, विजय बारकु माळी, हिरालाल कर्णकार, बाळू रामदास राणे, रत्नाकर शेंडे, फुंदीलाल माळी, महेश माळी, दिगंबर सुर्यवंशी, खुशाल सागर, मोहन माळी, भिका माळी, संदीप माळी, दीपक सुर्यवंशी, सुदेश सुर्यवंशी व संदीप मुके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी सत्यशोधक समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले प्रयत्न, शिक्षणाची केलेली कास व महिला सक्षमीकरणासाठी दिलेला लढा यावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. शेवटी सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त समाजातील युवकांना संघटित होऊन सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले असून यावेळी समाजबांधवांनी एकत्र येऊन बंधुभाव व ऐक्याचे दर्शन घडवले. फोटो : तळोदा येथील संत सावता माळी भवनात सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजन करताना डॉ डी बी शेंडे, अनिल माळी,विजय माळी, हिरालाल कर्णकार, बाळू रामदास राणे, रत्नाकर शेंडे, फुंदीलाल माळी,आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments