तळोदा हातोडा रस्ता व शहादा रस्त्यावरील पथदिवे बंद, त्वरित दुरुस्ती व कार्यान्वित करावी शिवसेना उबाठा ची मागणी
शिवसेना ऊबाठा च्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
तळोदा शहरातील हातोडा रस्ता आणि शहादा रस्त्यावरील बंद पथ दिव्यांबाबत तातडीने दुरुस्ती व कार्यान्वित करण्यात यावे मागणी केली. अन्यथा शिवसेना आणि युवासेना च्यावतीने नागरिकांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) यांनी निवेदनात दिला आहे.
याबाबत तळोदा शिवसेना उबाठा पक्षातर्फे पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हंटले आहे की, तळोदा शहरातील शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने, आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, तळोदा शहरातील हातोडा रस्ता आणि शहादा रस्त्यावरील पथदिवे बराच काळ बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असून, विशेषतः महिला, विद्यार्थी, आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, अपघातांचा धोका आणि असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हातोडा रस्ता आणि शहादा रस्ता हे तळोदा शहरातील प्रमुख मार्ग असून, येथील रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. पथदिवे बंद असल्याने रस्त्यांवर अंधार पसरला आहे, ज्यामुळे वाहनचालकांनाही अडचणी येत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी नोंदवल्या असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याबद्दल आम्हाला खेद वाटत आहे. या समस्येच्या गांभीर्याचा विचार करता, आम्ही खालील मागण्या आपल्या समोर ठेवत आहोत
तातडीने दुरुस्ती
हातोडा रस्ता आणि शहादा रस्त्यावरील सर्व बंद पथदिवे तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत.
नियमित देखभाल:
पथदिव्यांची नियमित तपासणी आणि देखभाल यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा स्थापन करावी, जेणेकरून भविष्यात अशी समस्या उद्भवणार नाही.
सुरक्षितता उपाय :
पथदिवे कार्यान्वित होईपर्यंत रात्रीच्या वेळी या रस्त्यांवर गस्त वाढवावी, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी मिळेल.
आम्ही आपणास विनंती करतो की, या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी. याबाबत ७ दिवसांच्या आत योग्य पावले उचलली जावीत, अन्यथा शिवसेना आणि युवासेना च्यावतीने नागरिकांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
आपण या विषयाला प्राधान्य देऊन तळोदा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही कराल, अशी आम्हाला खात्री आहे. असे म्हंटले आहे. या निवेदनावर
तळोदा शहरप्रमुख देवा कलाल, युवासेना शहरप्रमुख तुषार भांडारकर, तळोदा व्यापारी महासंघ अध्यक्ष आंनदभाऊ सोनार, शिवसैनिक भुषण सोनार, तालुका प्रमुख विपुल कुलकर्णी, युवासेना उपशहरप्रमुख हर्षल चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल,व्यापरी महा संघ उपाध्यक्ष अमित ठक्कर, आदीसह नागरिकांच्या सह्या आहेत.

Post a Comment
0 Comments