राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे तळोदा तालुका आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांच्यासह चिनोदा येथील अनेक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहिर पक्ष प्रवेश केला.
चिनोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे तळोदा तालुका आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी, कार्यकर्त्ये वसंत बद्रु पाडवी, नटु शंकर ठाकरे, गणेश सुरेश ठाकरे, हरी पाडवी, नरेश नटु ठाकरे, साजन जंगलसिंग पाडवी, अनिल लक्ष्मण पाडवी, सागर जंगलसिंग पाडवी, सुपड्या जतन नाईक, किरण दिलसिंग गावित, विष्णु भिमसिंग ठाकरे, अरविंद विरसिंग वसावे, भारत राम पाडवी, रोनक शंकर वळवी, शंकर गोविंद पाडवी, करण सुपड्या नाईक, सुरज किशन वसावे आदींनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी, मालेगांव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खेनवाणी, डाॅ.सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेश कांकरीया, भिमसिंग राजपूत, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रेम पाटील, धानोरा मंडलाध्यक्ष गणेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. आ.राजेश पाडवी यांच्या मतदार संघातील विकास कामांनी प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments