Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेजवा शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

 शेजवा शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

          नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत पिंपळोद केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषद उत्साहाने संपन्न झाली.  


    केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र पिंपळोद बीट सुंदरदे अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत आयोजीत करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शेजवा गावाचे सरपंच आनंदा वसावे हे होते तर प्रमुख म्हणून सुंदरदे  बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी, पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील केंद्र शाळेचे मुख्याध्यापक  आसिफ शेख  उपस्थित होते.

      यावेळी. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने करण्यात आली. आलेल्या सर्व अतिथीं मान्यवरांचे स्वागत माध्यमिक शाळेच्या इयत्ता 5 वी,6 वी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा गीतावर   नृत्य करून करण्यात आले  .

     अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी केले . पिंपळोद केंद्रातील जि.प मराठी शाळेचे तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                              यावेळी केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी मागील शिक्षण परिषदेच्या आढावा घेतला. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती वर आधारित गणित या विषयावर आदर्श पाठ शाळेचे उपशिक्षक  आर पी बागले यांनी घेतला.तर भूषण चौधरी यांनी कर्मयोगी भारत व रजिस्ट्रेशन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली .तर पालक परिषद व ग्रामसभा प्रक्रिया याविषयी संदीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली, श्रीमती कपिला पतिंगे ,श्रीमती कविता बोरसे यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन निष्पत्ती वर आधारित माझा  वर्ग माझे नियोजन गटकार्य याविषयी सविस्तर माहिती दिली, केंद्रप्रमुख यांनी केंद्र  आधारित शैक्षणिक गरजा व चर्चा नियोजन व अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती दिली त्यानंतर सुंदरदे बीटचे विस्तार अधिकारी डॉ. सचिन गोसावी यांनीही  विविध शैक्षणिक कार्य विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेची उपशिक्षक दीपक वळवी ,संजय बोरसे ,हरून खा शिखलीकर, संदीप गायकवाड ,श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे ,दिनेश पवार, समीर वसावे यांनी परिश्रम घेतले शिक्षण परिषदेची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments