तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालय कॅम्पस इंटरव्यूअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड
तळोदा समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत स्वदेश फाउंडेशन मुंबई आणि महाविद्यालयच्या समान संधी केंद्रच्या माध्यमाने कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
स्वदेश फाउंडेशन एक नामांकित सामाजिक क्षेत्रात काम करणारी विशेषता ग्रामीण सक्षमीकरण मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे संस्था आहेत. महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतच्या माध्यमाने वरिष्ठ समन्वयक आणि समन्वयक या पदासाठी 30 विद्यार्थी हजर होते. निवड विद्यार्थ्यांची नाशिक पालघर रायगड आणि नंदुरबार या जिल्ह्यात निवड करण्यात येणार आहे.
सदर मुलाखतीचे नियोजन हे प्राचार्य प्रा. उषा वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. निलेश गायकवाड यांनी केले. सदर मुलाखत चे नियोजन हे समान संधी विकास केंद्र च्या माध्यमाने करण्यात आले.
यासाठी संस्थाअध्यक्ष भरत माळी उपाध्यक्ष रोहित माळी कोषाध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी मार्गदर्शन केले. व यशस्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments