नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवरील हरकतींची जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी
नंदुरबार, दि. 08 सप्टेंबर
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला होता. या प्रस्तावास माननीय विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मान्यता दिली होती.
या सर्व हरकतींवर आज दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सविस्तर सुनावणी घेतली. सुनावणीस श्री. जमीर लेंगरेकर, जिल्हा सहआयुक्त, संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच हरकतदार व त्यांचे वकील उपस्थित होते.
या प्रक्रियेनंतर प्रभाग रचनेवरील अंतिम निर्णयासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असून, त्यामुळे आगामी नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट होणार आहे.
#Nandurbar #Election2025 #MunicipalElection #WardFormation #DrMitaliSethi #LocalGovernance #NashikCommissioner #NandurbarUpdates #PublicHearing



Post a Comment
0 Comments