उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी नितीन निळे
अमळनेर-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी अमळनेर येथील जेष्ठ पदाधिकारी नितीन सुभाष निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेनेच्या सामना या मुखपत्रातून सदर नियुक्ती जाहीर झाली आहे.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख संजय सावंत व उपनेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी सदरची नियुक्ती केली आहे. नितीन निळे हे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत सक्रिय असून यापूर्वी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना शहरप्रमुख,जिल्हाप्रमुख, शिवसेना अमळनेर शहर प्रमुख आदी पदांवर उत्कृष्ठ काम करून संघटन वाढीसाठी प्रयत्न केले आहे.सामाजिक,राजकिय व धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य असून असून अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सभापती पदावरही ते अनेक वर्षे कार्यरत होते.पक्षातील त्यांची कारकीर्द व व राजकीय आणि सामाजिक कार्य पाहता पक्षाने थेट उप जिल्हा प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्ती बद्दल त्यांचे अमळनेर सह जिल्हाभरातुन अभिनंदन होत आहे.शिवसेना पक्षवाढीसह स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

Post a Comment
0 Comments