"सेवा पंधरवडा" साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन
तळोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "सेवा पंधरवडा" साजरा करण्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत शिव रस्ते, पाणंद रस्ते व शेत रस्ते यांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली व अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत गायगावठाण/गायरान जमिनीवरील सन २०११ पूर्वीचे रहिवास प्रयोजनार्थ केलेल्या अतिक्रमणांचे नियमन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार विशेष उपक्रमांतर्गत ज्या महसुली गावांचे गावठाण मंजूर आहे, परंतु घोषित केलेले नाहीत, अशा गावठाणांना घोषित करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकरी स्तरावर ई-पीक नोंदणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
ग्रामसभेस तळोदा तहसीलदार दिपक धिवरे, सहायक गटविकास अधिकारी के एम पवार, विस्तार अधिकारी निकूम, तळोदा मंडळ अधिकारी तुषार साळुंखे, बोरद मंडळ अधिकारी मिथून राठोड, सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेमध्ये सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन उपस्थित ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.



Post a Comment
0 Comments