प्रतापपुर राणा प्रताप इंग्लिश स्कूल च्यावतीने साक्षरता विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील राणा प्रताप इंग्लिश स्कूल मध्ये मा.मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या परिपत्रका नुसार व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून साक्षरता वीषयक जनजागृती व्हावी या दृष्टीने रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या वेळी 5 वी ते 10 वी चे सर्व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. शिकलेली आई घरा -दाराला पुढे नेई, आमचा भारत साक्षर असो- साक्षर भारत संपन्न असो, घरी सर्वना शिक्षित करा, कुटुंबात आनंद आणा, मुलगा -मुलगी एक समान, दयावे त्यांना शिक्षण छान अशा घोषणा देत प्रतापपुर गावातून रॅली काढण्यात आली.
या वेळी राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे, पर्यवेक्षक ए एन चौधरी, प्रतापपुर केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीमती रंजना निकुंभे, जि प मुख्याध्यापक भागवत, गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, जि प. प्रा. शाळेचे शिक्षक, राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साक्षरता रॅलीत सहभागी झाले होते.



Post a Comment
0 Comments