शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त समाज प्रबोधनपर उपक्रमास प्रतिसाद
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त व्यसनमुक्ती तसेच सामाजिक प्रबोधन पर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुरत येथील निवृत्त शिक्षक दत्तू मराठे यांनी व्यसनमुक्तीपर मराठी, व अहिराणी भाषेत मार्मिक उद्बोधन केले. तसेच तोरखेडा (ता. शहादा)येथील कवयित्री पूजा योगेश सोनार यांनी केले.
नंदुरबारचे हुतात्मा शिरीषकुमार आणि सहकाऱ्यांचे बलिदान, सद्यस्थितीत शेतकऱ्यांची व्यथा, कौटुंबिक प्रश्न, यावर कवितेच्या रूपातून मांडणी केली. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तर नंदुरबार येथील नवोदित कवयित्री हर्षा विलास चौधरी यांनी खानदेशातील रूढी व परंपरांवर कविता सादर केल्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत माहिती दिली. लीना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे यांनी स्वागत केले.
सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, विशाल हिरणवाळे यांनी केले.पर्यावरण पूरक गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमाबाबत माजी आमदार शिरीष चौधरी, खानदेशी कलावंत अरुण सोनार, उद्योजक सुरजमलतोष्णीवाल, कर सल्लागार सुरेश जैन, यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
.




Post a Comment
0 Comments