एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा
तळोदा , येथील एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी के.जी. सेक्शन च्या विद्यार्थ्यांनी हिंदी बडबड गीते सादर केलीत तर प्रायमरीच्या समर्थ गिरासे याने भाषण सादर केले तर बाकी विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर केल्या हायस्कूल सेक्शनचे विद्यार्थी प्रीत देवेंद्र सोनगढवाला याने हिंदी राष्ट्रभाषा दिवस निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेवर नाटिका सादर केली. ज्यात हिंदी भाषेचे महत्व प्रदर्शित करण्यात आले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी व्याकरणावर आधारित पोस्टर प्रदर्शन केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थी प्रथमेश हेमंत हिवरे याने स्वरचित कविता सादर केली. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थी पियुष पाडवी याच्या हास्य कवितेने सर्वांना खळखळून हसवले.
मुख्याध्यापक नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात मराठी ही आपली मातृभाषा आहे. तर हिंदी भाषा ही आपली मावशी आहे असे प्रतिपादन केले. हिंदी लिखित विविध साहित्यांच्या व लेखकांच्या कवींच्या याप्रसंगी नाईक यांनी माहिती सांगितली. हिंदी भाषा किती समृद्ध असून त्यात जगातील सर्वात मोठे महाकाव्य लिहिले गेले आहे असे हिंदी विभागाचे प्रमुख देवदान वळवी यांनी माहिती दिली. या प्रसंगी शाळेतील हिंदी विभागा च्या वतीने हिंदी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिल्क वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाडवी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment
0 Comments