Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोद्यात भारतीय जैन संघटनेतर्फे "सन्मान गुरुजनांच्या सोहळा कर्तुत्वाच्या" कार्यक्रम संपन्न

 तळोद्यात भारतीय जैन संघटनेतर्फे "सन्मान गुरुजनांच्या सोहळा कर्तुत्वाच्या" कार्यक्रम संपन्न .

                            तळोदा येथील पी.ई सोसायटीचे शेठ के.डी हायस्कूल येथे भारतीय जैन संघटनेतर्फे सन्मान गुरुजनांच्या सोहळा कर्तुत्वाच्या कार्यक्रम संपन्न झाला. 

                      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी. ई.सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे , मुख्याध्यापक जितेंद्र माळी, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड अल्पेश जैन,  दीपेश जैन, शहराध्यक्ष राकेश जैन, उपाध्यक्ष आशिष जैन, सुशील सूर्यवंशी, राजकुमार जैन, रमेश चव्हाण, प्राध्यापक पूजा जैन, आय आर चव्हाण, चेतन शर्मा, चेतन धनका कुशल जैन, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

                   या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक सेवानिवृत्त गुरुजनांच्या सन्मानपत्र ,शाल ,श्रीफळ वृक्ष रोप  देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन व स्वागत गीतानंतर कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला.                  कार्यक्रमाचे  प्रास्तविक प्राध्यापक पूजा जैन यांनी केले आपल्या प्रास्तविकातून त्यांनी शिक्षक भावी पिढी घडवीत असतात त्यांचे स्थान समाजात अत्यंत मोलाचे दीपस्तंभ सारखे असते असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात सन्मानपत्र शाल श्रीफळ वृक्षरोप देऊन सेवानिवृत्त गुरुजनांच्या सत्कार करण्यात आला. अशोक सूर्यवंशी, दिलीप पटेल ,प्रा राजाराम  राणे शरद सूर्यवंशी सदाशिव चित्ते, जयश्री पाटील आदी शिक्षक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भारतीय जैन संघटनेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड अल्पेश जैन, राहुल जैन आशिष जैन, दीपेश जैन, कुशल जैन व त्यांचे सहकारी यांनी केले 

                   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वानखेडे यांनी केले. तर रमेश कुमार भाट यांनी उपस्थित आमचे आभार मानले. कार्यक्रमात सदाशिव चित्ते ,आर एस पाटील, ए व्ही कलाल, अशोक सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, बि.डी कलाल, सुशीला कलाल ,आर व्ही कलाल, आर व्ही राणे, एच.एम पिंपरे, पी आर कुलकर्णी, प्रतिभा जगताप, प्रा. रमेश मगरे, प्रा. पूजा जैन, केशव इंगळे ,डी.सी पाटील, हेमलता इंगळे असे एकूण 18 सेवानवृत्त शिक्षकांच्या सन्मान करण्यात आला कार्यक्रमास शेठ के. डी हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments