राज्य परिवहन मंडळाच्या बस चा आपघात
वाल्हेरी ते तळोदा एस टी बस भवर जवळ उलटली
अपघातात 70 ते 75 विद्यार्थी प्रवासी दुखापती
उपजिल्हा रुग्णालयात दुखापतींवर उपचार सुरू
राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला उ. या झालेल्या अपघातात एस टी बसमधील 70 ते 75 विद्यार्थी प्रवासी दुखापती झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी व त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात दुखापतींची विचारपूस केली आरोग्य विभागाला सूचना केल्यात.
राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकुवा आगाराची तळोदा बस स्थानकातून सुटणारी वाल्हेरी ते तळोदा एस टी बस क्रमांक एम एच 06 एस 8661 ही सकाळी प्रवासी घेऊन वाल्हेरी हून तळोद्याकडे परतताना भवर गावा जवळील वळणा जवळ पुढे जाऊन उलटली. त्यात 70 ते 75 विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करीत होते. एस टी बस उलटली त्यातील सर्व प्रवासी विद्यार्थी दुखापत झाले आहे. भवर येथील श्रीकांत पाडवी व ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनावर दुखापतींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असून चार विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक नातलगांनी गर्दी केली होती. श्रीकांत पाडवी, आमदार राजेश पाडवी यांचे स्विय सहाय्य किरण सुर्यवंशी, मदत सहाय्यता केंद्र समन्वयक योगेश मराठे, सतीश वळवी, राजू प्रधान, योगेश पाडवी, वाल्हेरी पोलीस पाटील रवींद्र पाडवी, आकाश वळवी, यांनी मदत कार्य केले. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी, गौरव वाणी, दारा वसावे, दरबारसिंग पाडवी, अमन जोहरी, परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे, वाहतूक नियंत्रक भावेश गोसावी अदी दाखल झाले. आमदार राजेश पाडवी यांनी दुखापतींची विचार पुस करत तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्यात व दुखापतींना नाश्ता पिण्याच्या पाण्याची सोय केली.

Post a Comment
0 Comments