तळोदा श्री काका गणेश मंडळ तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तळोदा, ता. २७ दरवर्षी गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील श्री काका गणेश मंडळामार्फत यावर्षी देखील गणेशोत्वाचा पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २६) दुपारी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा एकूण तीन गटात घेण्यात आली होती आणि त्यात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. शालेय वयातच सामान्य ज्ञानाचा चालू घडामोडी विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अपडेट ठेवावे. विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे व आपली प्रगती साधावी या हेतूने येथील श्री काका गणेश मंडळ तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील कन्या विद्यालयात सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतचा गट. इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी पर्यंत गट तर इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी असे गट करण्यात आले होते. यात इयत्ता पहिली ते चौथीचा गटात ३० विद्यार्थी, इयत्ता पाचवी ते सातवी गटात ४० विद्यार्थी, आठवी ते दहावी गटात ३० विद्यार्थ्यांनी मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
यावेळी श्री काका गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील तीनही गटांना माजी मुख्याध्यापक निमेशचंद्र माळी यांच्याकडून पेन भेट देण्यात आली. पंकज राजकुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हितेश शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री काका गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



Post a Comment
0 Comments