तळोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त तळोदा शहरात पारंपरिक वाद्य ढोल, तुर वाद्यचा गजरात पारंपरिक पेराव करीत याहा मोगी माता पूजनाची हिजारी डोक्यावर घेत पारंपरिक नृत्याचा ठेका धरत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध गावाचे कला ढोल पथक सहभागी झाले होते. रॅलीत आदिवासी संस्कृती चे दर्शन घडवणाऱ्या रॅली ने लक्ष वेधले होते.
तळोदा येथील भगवान बिरसा मुंडा स्मारकाचे पूजन करून अभिवादन प्रसंगी माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार राजेश पाडवी, राजेंद्रकुमार गावित, सुहास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती च्या वतीने सांस्कृतिक दर्शन घडवणारी रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅलीत माजी मंत्री पद्माकर वळवी, योगिताताई वळवी, जि.प. माजी अध्यक्ष सीमाताई वळवी, निशा वळवी, राजेंद्रकुमार गावित, जी प माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, प. स. माजी सभापती यशवंत ठाकरे, रुपसिंग पाडवी, अर्जुन वळवी, प स माजी सभापती लताबाई वळवी, दयानंद चव्हाण, देविसिंग वळवी, दीपक मोरे, रोहिदास पाडवी,प्रवीण वळवी, प्रकाश वळवी, धर्मेंद्र वळवी भटू पाडवी, नाथ्या पावरा, पंकज पावरा आदीसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव सहभाग झाले होते.
या सांस्कृतीक रॅली चे आयोजन नियोजन कांतीलाल पाडवी, रंजितसिंग पाडवी, प्रताप वळवी आदी व पदाधिकारी यांनी केले होते.

Post a Comment
0 Comments