नेमसुशिल शैक्षणिक समूहात विश्व आदिवासी दिवस साजरा
तळोदा - शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यामंदिरातील मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी मुख्या. भावना डोंगरे, मुख्या. गणेश बेलेकर हे होते. प्रसंगी याहा मोगी भगवान बिरसा मुंडा खाज्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींनी बोलीभाषेतून गाणी मनोगते पारंपरिक नृत्य सादरीकरण केले विद्यामंदिरातील शिक्षक योगेश पाडवी यांनी रोडाली सादर करून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता वसावे नाईक मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण कुवर यांनी मानले.

Post a Comment
0 Comments