काझीपुर येथे वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; आमदार राजेश पाडवींची घटनास्थळाची पाहणी, वनविभागाला तात्काळ कारवाईचे आदेश
तळोदा येथील काजीपुर शिवारात दिनांक 9 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारास बावीबाई सांगल्या वळवी (वय 70) या शेतातून बाजार करण्यासाठी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या. जखमी महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ उप वन संरक्षण अधिकारी चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम यांना घटनास्थळी पंचनामा करण्याचे व बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्याचे आदेश दिले.
आज सकाळी आमदार पाडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सरपंच कैलास पाडवी, उपसरपंच भीमसिंह पाडवी, विवेक पाडवी, प्रवीण वळवी विठ्ठल बागले, किरण सूर्यवंशी, प्रफुल माळी, अक्षय जोहरी, मयूर कलाल यांनी वन परिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम यांच्या उपस्थितीत पाहणी केली व आमदार राजेश पाडवी यांनी वनविभागाला बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आमदारांनी जखमी महिलेच्या उपचारांची काळजी घेण्याचे आश्वासनही कुटुंबियांना दिले.




Post a Comment
0 Comments