कृषी विज्ञान केंद्रास शेतकऱ्यांची भेट कृषी मेळाव्याचे आयोजन तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळांचा उपक्रम
तळोदा येथील मोठा माळीवाडा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ व डॉ. हेडगेवार सेवा समिती (KVK) संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य कृषी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात शेतकरी बांधवांना विविध कृषी अवजारे, नवीन व पारंपरिक पिके, आधुनिक शेती पद्धती, स्वयंरोजगाराच्या संधी, सुपोषण वाटिका, फळवाटिका, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञांनी शेतकऱ्यांना शाश्वत व नफ्याची शेती करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ-श्रेष्ठ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचे वैभव वाढविले.



Post a Comment
0 Comments