एस. ए. एम इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा
तळोदा, येथील एस. ए. एम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते . आदिवासी गौरव दिनाची प्रस्तावना राजेंद्र पाडवी यांनी केली. प्रस्तावनेत राजेंद्र पाडवी यांनी आदिवासी दिवसाच्या महत्त्व विशद केले.
नीलकंठ सूर्यवंशी यांनी रान भाज्या महत्व व उपयुक्तता आदिवासी बोली भाषेत माहिती सांगितली. किरण कुमार मगरे यांनी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा ,खाजा नाईक, तंट्या भिल, तिलक मांझी, सिंधू कान्हू मूर्म,वीर सुरेंद्र साई, लक्ष्मण नाईक, राघोजी भांगरे यांच्या कार्याची व देशाच्या स्वातंत्र लढ्यात त्यांच्या योगदान याबद्दल माहिती सांगितली. तसेच 2 मार्च 1943 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अकरानी महाल तालुक्यात रावला पाणी येथे आदिवासी सत्याग्रहीवर ब्रिटिशांनी अमानुषपणे बेछूट गोळीबार केली. ते स्थान आज सर्वांसाठी प्रेरक व आदिवासी बांधवांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान चे प्रतीक आहे असे प्रतिपादन केले. विशाल पाडवी यांनी 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी गौरव दिन हा भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बद्दल का म्हणून साजरा करण्यात येतो त्याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली. देवदान वळवी यांनी आदिवासी स्त्रिया परिधान करत असलेल्या विविध पारंपारिक चांदीचे आभूषण व त्यांना आदिवासी बोली भाषेत कोणत्या नावाने बोलले जाते याबद्दल माहिती सांगितली. सौ विद्या वळवी यांनी वीर एकलव्य यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून महाभारतातील एक नायक याच्या जीवन बद्दल माहिती सांगितली.
मुख्याध्यापक सत्यजीत नाईक यांनी आदिवासी हे जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी विखुरलेले असून जल, जंगल व जमीन यांचे रक्षक आहेत व जल ,जंगल व जमिनीवर पहिला हक्क हा आदिवासींच्या आहे असे प्रतिपादन केले. आपल्या नंदुरबार जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या विविध आदिवासी बोली भाषेत पावरी ,मथवाडी ,धानकी मावची, कोकणी या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून उत्साह पूर्ण वातावरण तयार केले तसेच ह्या बोली भाषेवरील प्रभुत्वाने उपस्थितना आवाक केले .
कार्यक्रमाची सांगता आदिवासी बोली भाषेत आभार प्रदर्शन करून चंदना नाईक यांनी केले.



Post a Comment
0 Comments