Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक  व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

               तळोदा :  तालुक्यातील कोठार येथिल अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनुसार अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. 

              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक निंबा रावळे होते. याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे, मांगीलाल भदाणे,श्रीमती निता गुरव,जितेंद्र चौधरी, कीर्तीकुमार वाणी, पन्नालाल पावरा आदी उपस्थित होते.

         कार्यक्रमात शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी दोन्ही पुरुषांच्या जीवन कार्याला उजाळा देणारी भाषणे केली. शाळेचे शिक्षक मांगीलाल भदाणे,जितेंद्र चौधरी, जयवंत मराठे,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. रावळे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांनी सामाजिक व राजकीय एकात्मतेसाठी केलेले प्रयत्न करा अण्णाभाऊ साठे यांनी उभारलेले सामाजिक काम व साहित्य विषयक योगदान याबद्दल माहिती. 

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश चव्हाण,ब्रह्मराज नाईक,चेतन अहिरराव, विद्या पवार,कविता पावरा, सागर सोजळ,जयेश कोळी, योगेश भारती,महेश वायकर, देवीलाल पाठक, यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन हरी भारती यांनी केले तर हंसराज महाले यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments