नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव
नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील पुरातन व प्रसिद्ध असे श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सकाळी काकड आरती व मंगळा आरती नंतर श्री द्वारकाधीशास पंचामृत अभिषेक व पूजा होईल. शृंगार व धुपारती दर्शन होईल. सायंकाळी संध्या आरती व आठ ते अकरा भजन मंडळी द्वारा संगीतमय भजन होईल. रात्री 11 ते 12 श्री कृष्ण जन्माख्यानाचे प्रवचन आचार्य प्रशांत महाराज करतील. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म व देवाची आरती, पाळणा दर्शन होईल. सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री द्वारकाधीश मंदिर संस्थान नंदुरबार यांच्याकडून करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments