तळोदा नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण
तळोदा - शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेली संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, सोनाभाभी तुरखीया, डी. एम. महाले, संजय पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित सूर्यवंशी कुटुंबातील जयेंद्रभाई सूर्यवंशी एकनाथ भाई सूर्यवंशी यशवंतभाई सूर्यवंशी यांच्या हस्ते नेमसुशिल शैक्षणिक परिसरात क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रवास तिरंगी झेंड्याचा व विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी डी शिंपी, उप प्राचार्या सौ. कल्याणी वडाळकर, मुख्या.श्रीमती भावना डोंगरे, मुख्या.गणेश बेलेकर विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुवर यांनी केले तर आभार चंद्रकांत भोई यांनी मानले.


Post a Comment
0 Comments