Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चिनोदा शिवारात बिबटच्या हल्ल्यात वासरू ठार, वनविभागाने बिबटचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी

 चिनोदा शिवारात बिबटच्या हल्ल्यात वासरू ठार, 



 वनविभागाने बिबटचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी



बिबटच्या हल्ल्यात वासरूचा फडशा पडल्याची घटना चिनोदा शिवारात घडली. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.



       तळोदा तालुक्यातील चिनोदा येथिल गणेश रघुनाथ मराठे यांच्या शेत शिवारात  सव्हे नंबर 67/3/ब  या क्षेत्रात गायीचे वासरू मिळून आले. मृत वासरू हे श्रीकृष्ण गोशाळा येथील असून  मृत वासरू हे 2 ते 3 दिवसापासून गणेश मराठे यांच्या शेतात वास्तव्य करीत असतांना  बिबटने हल्ला करून वासरूस ठार केले.  घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल भारती सयाईस, नवरक्षक राहुल कोकणी, शेतकरी गणेश मराठे, विलास मराठे, गोशाळा उपाध्यक्ष धनराज मराठे यांच्या उपस्थित पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्यात आली. या परिसरात बिबट चे वास्तव्य आहे. बिबटचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments