तळोदा येथे धान्य मार्केट जवळ क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नामकरण करण्यात यावे जय आदिवासी युवा शक्ती संघटनेची मागणी
तळोदा येथील बाजार समिती जवळ चौकास क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नाव द्यावे प्रशासनाने नामकरण करण्याची मागणी जय आदिवासी युवा शक्ती संघटना तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनात केली आहे.
याबाबत तळोदा नगर पालिका प्रशासक तथा मुख्यधिकारी विक्रम जगदाळे यांना जय आदिवासी युवा शक्ती संघटने मार्फत निवेदन सादर केले आहे. त्यात म्हंटले आहे कि, कृषि उत्पन्न बाजार समिती धान्य मार्केट जवळ तळोदा येथे नविन रस्त्याचे उत्कृष्ट रित्या बांधकाम पूर्ण झाले आहे. त्या रस्त्याला लागून वस्तीत पूर्णपणे आदिवासी वसाहत आहे. म्हणून प्रशासनाच्या वतीने क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नामकरण करून लोकार्पण करावे अशी विनंती वजा मागणी केली आहे. निवेदनावर जय आदिवासी युवा शक्ती अध्यक्ष विवेक पाडवी, अभय वळवी, रवींद्र गावित, सतिष नाईक, लखन पाडवी पंकज वसावे, आकाश पाडवी, शरद पाडवी, अमृत पाडवी, खुश पाडवी, निलेश पाडवी, सावंत पाडवी, धीरज पाडवी, केशव वळवी, मनोज पाडवी, रोहित वळवी, विवेक वसावे, चेतन वळवी आदीच्या सह्या आहेत.

Post a Comment
0 Comments