तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी
तळोदा येथील रहिवासी अनमोल सुरेश सुर्यवंशी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात ऑरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदोर येथून डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी ) ही मानद पदवी पूर्ण केली असून ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर चे व्हाईस चान्सलर डॉ. सुनील सोमाणी यांच्या हस्ते विद्यापीठात प्रदान करण्यात आली.
त्यांनी 2020 साली हा शैक्षणिक प्रवेश घेतला व जागतिक कोरोना महामारीच्या काळात कोर्सवर्क पूर्ण करून त्यांनी पुढे "अँन अप्रोच टूवर्ड्स इम्प्रोव्हमेन्ट ऑफ कॉन्टीग्यूस मेमरी अलोकेश इन द लिनक्स कर्नल" या विषयावर संशोधन नोंदवले.
या संशोधनात त्यांनी प्रचलित पद्धतींमध्ये आढळणाऱ्या त्रुटी — जसे की आय.ओ.एम.एम.यू, स्कॅटर- ग्यादर डी.एम.ए., आणि स्टॅटिक मेमरी रेसेर्व्हशन पद्धती— यांचा सखोल अभ्यास करून एक नवीन प्रणाली आय.सी.एम.ए. (इंप्रुवड कंटीगुअस मेमरी आलोकेशन ) विकसित केली.
ही प्रणाली विशेषतः 32-बिट लो-एंड डिव्हाइसेस साठी उपयुक्त असून, ती विलंब (लाटेन्सी ) कमी करते आणि आलोकेशन फैलिअरच्या समस्या दूर करते.
आय.सी.एम.ए मध्ये केवळ गरज असल्यावरच व्हर्चुअल मेमरीला फिझिकल मेमरीशी डायनामिकाली मॅप केलं जातं, जे सिस्टमच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करते.
या काळात त्यांनी स्कोपस , एस.सी.आय आणि वेब ऑफ सायन्स मध्ये सूचीबद्ध चार आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध यशस्वीरित्या प्रकाशित केले.
सध्या ते एस.व्ही.के.एम निम्स ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल मित्र परिवार नातेवाईक तसेच शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय व्यक्ती कडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments