नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती
नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा. नमन गोयल (IAS) यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून सन्मान केला. स्वागत सोहळ्यात उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) श्रीमती अंजली शर्मा (IAS) व उपविभागीय अधिकारी (तळोदा) श्री. अनय नवंदर (IAS) यांनीही मा. गोयल यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या स्वागत समारंभात जिल्ह्याच्या विविध विकास योजनांबाबत, शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी, तसेच जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी मा. नमन गोयल यांचे अभिनंदन करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. नमन गोयल यांनी आपल्या भाषणात नंदुरबार जिल्ह्याच्या प्रगतीसाठी समर्पित व परिणामकारक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या स्वागत प्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.
.
.
#Nandurbar #ZPCEO #IAS #NamanGoel #CollectorOfficeNandurbar #DrMittaliSethi #DistrictDevelopment





Post a Comment
0 Comments