Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदूरबार विधी महाविद्यालयात आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा

 नंदूरबार विधी महाविद्यालयात आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा

                                   नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय नंदुरबार व राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत दि. ९  रोजी आदिवासी दिवस व क्रांतिकारी दिवस या विषयावर कार्यक्रम घेण्यात आले.   

                  याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन.डी. चौधरी यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा व शिरीष मेहतायांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीवीरांना नमन केले. त्यांनी लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, वीर भगतसिंग, चंद्रशेखर आजाद इत्यादींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानातील महत्त्व सांगितले. आदिवासी बांधवांना संविधानाद्वारे जे अधिकार प्राप्त झालेले आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असेही आवाहन मान्यवरांनी  केले. 

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशा तिवारी यांनी केले. व आभार प्रदर्शन  डॉ. के. एस. मराठे यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित होते. 

 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोजभैय्या रघुवंशी तसेच संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.

Post a Comment

0 Comments