आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड
पुणे -बिरसा आर्मी एक सामाजिक, वैचारिक संघटना आहे. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते. आतापर्यत अनेक प्रश्न हाताळून सोडवले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे आदिवासी वादळ म्हणून प्रसिद्ध असलेले देवराम लांडे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चिंधू आढळ,राज्याध्यक्ष मनोज पावरा, अमोल लांडे, कार्याध्यक्ष राजेश गाडेकर,सचिव संतोष बोटे, सहसचिव खंडू काठे, संघटक शशिकांत आढारी, किशोर माळी, अनंता मेठल, बारकु ठोकळ, भिमराव भोकटे, भगवान देशमुख , तुलसीदास कोडापे,प्रवक्ता राजेंद्र चौरे, पुणे जिल्हाध्यक्ष काळू गागरे, महिला अध्यक्षा,बचैताली केंगले,मालतीताई किन्नाके , विनायक पारधी,आदी.पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments