Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ब्रह्माकुमारीज नंदुरबार, ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 ब्रह्माकुमारीज नंदुरबार, ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


                        नंदुरबार (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी ओम शांती परिवाराच्या समाज सेवा प्रभागातर्फे आयोजित भव्य रक्तदान महा शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


                           नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथील गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले.तसेच मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेस लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. शिरीष शिंदे व जनकल्याण रक्त केंद्राचे अधिकारी डॉ. अर्जुन लालचंदाणी यांनी पुष्प अर्पण केले.

याप्रसंगी डॉ. शिरीष शिंदे यांनी सांगितले की, सामाजिक उपक्रमांचा गजर न करता कर्म व कर्तुत्वाचा जागर व्हावा. यासाठी रक्तदानासारख्या महान कार्यास प्रत्येकाने सहभाग नोंदविने गरजेचे आहे. रक्तदान महा शिबिरास भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदान शिबिरात शुभेच्छा दिल्या. दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नंदुरबार केंद्र, लायन्स क्लब, लायन्स फेमिना तसेच जनकल्याण रक्त संकलन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 50  पेक्षा अधिक  प्रमाणावर दात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. 

नंदुरबार केंद्राच्या संचालिका बीके योगिता दीदी यांनी  सांगितले की, ब्रह्माकुमारीज सेवा व समाज विभागातर्फे आयोजित रक्तदान शिबिराची विश्व विक्रमात नोंद होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम शांती परिवाराचे नंदुरबार जिल्हा मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे यांनी केले. रक्तदान शिबिरास लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. शिरीष  शिंदे, लायनेस फेमिनाच्या सुप्रिया कोतवाल, डॉ. तेजल चौधरी,अध्यक्षा रंजना बोरसे, कोषाध्यक्ष सुरेखा वळवी, रणजीत राजपूत उपस्थित होते.

रक्तदान महाशिबीर यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नंदुरबार केंद्रातील बीके योगिता दीदी,बीके वर्षा दीदी, बीके आरती दीदी,डॉ. भगवान पटेल, इंजिनीयर भगवान पाटील, साधक व भगिनींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments