तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक
तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीने स्वच्छता, हरित, नियोजनबद्ध आणि विकासमुखी कामगिरीच्या बळावर, विकासाची नवी उंची गाठत आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा मान 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्व. आर.आर. आबा पाटील हे राज्याचे माजी मंत्री व आमदार होते. ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
तळवे ग्रामपंचायतीच्या या यशस्वी प्रवासात लोकनियुक्त सरपंच मोग्या भील, ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा वळवी, ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाई पाटील, उपसरपंच ताराचंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठाकरे, दिपक ठाकरे, तसेच विलास पाडवी, राजेश बारीकराव आदी मान्यवर उपस्थित होते.
तळवे गावातील स्वच्छता मोहिमा, पाणी व्यवस्थापन, रस्ते सुधारणा, वृक्षारोपण, तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे तळवेने आदर्श ग्रामपंचायतीचा आदर्श घालून दिला आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला.
“हा सन्मान तळवे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामस्थाचा आहे, ज्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले,” असे लोकनियुक्त सरपंच मोग्या भील यांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments