तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण
तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला
तळोदा :- नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत स्पोर्ट्स कराटे असोसिएशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेल्ट परीक्षेत यश मिळवले. यावेळी सीनियर ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आले.
या ब्लॅक बेल्ट परीक्षेत तळोदा येथील मोक्षीत शेंडे हा अहिंसा इंटरनॅशनल स्कूलचा हा विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले. मोक्षित शेंडे हा तळोदा तालुक्यातील पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला आहे. त्याला कराटे संघटनेचे अध्यक्ष राजेश परदेशी, उपाध्यक्ष मीनल वळवी, सचिव प्रा. डॉ. दिनेश बैसाणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. बेल्ट ग्रेडेशन परीक्षा करिता निरीक्षक म्हणून चंदना लोढा, कृष्णा बैसाणे, खुशी देसले, हर्षवर्धन वळवी यांनी काम पाहिले. या यशस्वी विद्यार्थ्यांला दिप स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षिका राष्ट्रीय खेळाडू दिपाली साळुंके-शिंदे व कराटे प्रशिक्षक प्रा. डॉ दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments