नासिक मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न
अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव यांची निवड
नासिक येथील मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची 27 वी वार्षिक सर्व साधारण सभा सी आय डी पुणे सेनानिवृत्त आयुक्त रमाकांत वसंतराव जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंडळाच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमाकांत वसंतराव जावळे, सेनानिवृत्त आयुक्त, सी आय डी पुणे हे उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीत पार पडली,
यावेळी मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे निवडणूक घेण्यात आली त्यात 13 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या 13 सदस्यांची पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली बैठकीत खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव, उपाध्यक्ष पदी दत्तु त्र्यंबक सोनवणे, सचिव पदी गोकुळ सुपडू सुर्यवंशी तर कोषाध्यक्ष पदी सुभाष रामदास पवार तर सहसचिव पदी राजू नारायण मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्यपदी सर्वश्री श्यामसुंदर लक्ष्मणराव जगताप, मोतीराम सिताराम सोनवणे, हरीश बेनदेव मराठे, सुभाष पंडित शेळके, रमेश नामदेव कदम, निंबा त्र्यंबक शिंदे, नामदेव पंडित पवार, भारत तुकाराम सोनवणे आदीच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचीत पदाधीकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडी बद्दल समाज बांधवांच्या सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



Post a Comment
0 Comments