विद्यार्थ्यांसोबत ‘सीईओ’नी केले जेवण – शैक्षणिक गुणवत्तेसाठी दिला मार्गदर्शनाचा धडा
नंदुरबार जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (IAS) यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील शालेय गुणवत्तावाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्र शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व पोषण आहाराचा आस्वाद घेतला.
गुणवत्तावाढीसाठी सूचना:
जि.प. सीईओ यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त, शैक्षणिक प्रगती आणि शाळेतील स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले. शाळेत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती शिक्षकांकडून जाणून घेतली. विशेषतः, पायाभूत संख्याज्ञान आणि किमान अध्ययन क्षमता (FLN) प्रत्येक बालकाने गाठावी यावर त्यांनी भर दिला.
शालेय उपक्रमांचा आढावा:
मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी शाळेतील परसबाग, लोकसहभागातून करण्यात आलेली कामे, शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक समितीचे कार्य, शाळेची इमारत या सर्वांचा सविस्तर आढावा दिला. विद्यार्थ्यांनी मराठीसह इंग्रजी भाषेत संवाद साधत आपली गुणवत्ता दाखवून दिली.
विद्यार्थ्यांसोबत थाळीतील जेवण:
यावेळी सीईओ गोयल यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत रांगेत बसून पोषण आहाराचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले.
अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. सोनवणे, स्विय सहाय्यक किशोर पटेल, महेंद्र अहिरे तसेच गावातील ग्रामपंचायत अधिकारी एन.पी. दहिफळे, शिक्षक उज्वला पाटील, शुद्धोधन इंगळे, वर्षा गावित, सर्वजित पाडवी आदी उपस्थित होते.
जी प सीईओ नमन गोयल यांची ही शाळा भेट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली असून, जिल्ह्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.



Post a Comment
0 Comments