Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ब्रह्माकुमारीज शहादा ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 ब्रह्माकुमारीज शहादा ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

             शहादा (प्रतिनिधी) प्रजापिता  ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त  ओम शांती परिवाराच्या समाज सेवा प्रभागातर्फे आयोजित भव्य रक्तदान महा शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

 आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. तसेच मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेस शहादा केंद्र संचालिका यांनी पुष्प अर्पण केले.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि जनकल्याण रक्त संकलन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 50  पेक्षा अधिक  प्रमाणावर दात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. शहादा केंद्राच्या संचालिका बीके विद्या दीदी यांनी  सांगितले की, ब्रह्माकुमारीज सेवा व समाज विभागातर्फे आयोजित रक्तदान शिबिराची विश्व विक्रमात नोंद होणार आहे.    उपस्थित होते.

रक्तदान महाशिबीर यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शहादा केंद्रातील ,    साधक व भगिनींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments