Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझीम पथकाने वेधले तळोदेकरांचे लक्ष!

 गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझीम पथकाने वेधले तळोदेकरांचे लक्ष! 

`बिरसा मुंडा चौक ते कन्या विद्यालयापर्यंत रिमझिम पावसातही तालबद्ध हालचालींनी भारावलेले वातावरण` 

                        तळोदा  : येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय, तळोदा यांच्या लेझीम पथकाने आपल्या दमदार ताल, शिस्तबद्ध हालचाली व आकर्षक सादरीकरणाने तळोदेकरांची मने जिंकली.

क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक ते कन्या विद्यालय या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणुकीच्या स्वरूपात पथकाने प्रवेश केला. ढोल-ताशांच्या गजरात विशेष पोशाख परिधान करून स्मारक चौक, तळोदा येथे आल्यानंतर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

विशेष म्हणजे, रिमझिम पावसातही विद्यार्थिनी उत्साहाने ताल धरत लेझीम वाजवत होत्या. पावसाच्या सरींचा आनंद घेत मुलींनी केलेले हे सादरीकरण प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले.


विद्यार्थिनींच्या जोशपूर्ण हालचालींतील समन्वय, हालचालीतील दमदारपणा व तालातील नजाकत पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थिनींनी इतक्या देखण्या पद्धतीने सादरीकरण करणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त झाले.


या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. चेतनदादा पवार, उपाध्यक्ष प्रतिभाताई मगरे, संस्थेचे कोऑर्डिनेटर निमेशदादा सूर्यवंशी, संचालक महेश मगरे सर, गोरख राणे, तसेच सुजाता साळवे आदी मान्यवरांनी पथकाचे कौतुक केले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. लेझीम पथक प्रमुख दिलीप तडवी, सांस्कृतिक समिती सदस्य दिनेश मराठे, योगेश पाटील, वैशाली देवरे, अनिल इंदिस, भाग्यश्री सागर, ज्योती महाजन, हरिश्चंद्र कोळी, उल्हास मगरे तसेच कै. आप्पासाहेब भिकाभाऊ महाजन प्राथमिक विद्या मंदिराचे शिक्षकवृंद रजनी माळी, चित्रा पाटील, शशिकांत नगराळे, सुनंदा वाघ यांचा मोलाचा सहभाग लाभला .यासोबतच अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम माळी आदींनी परिश्रम घेतले. 


लेझीम पथकाच्या यशामागे शिक्षकांचा परिश्रम आणि विद्यार्थिनींचा उत्साह महत्त्वाचा असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तळोदा शहरात या सादरीकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, “कन्या विद्यालयाचे लेझीम पथक म्हणजे ताल, शिस्त आणि संस्कृतीचा संगम” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments