महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या राज्य अधिवेशन
राज्य अध्यक्षपदी कॉ. नत्थुभाऊ साळवे, सहसचिव पदी कॉ. सुदाम ठाकरे यांची निवड
राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे
तळोदा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे १२वे राज्यस्तरीय अधिवेशन माजलगाव जि. बीड येथे पार पडले त्यात राज्य कमिटी निवड करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातून चार कॉम्रेडांचा समावेश झाला आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे १२ वे राज्य अधिवेशन दि. १७, १८ व १९ रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पार पडले. एका उत्स्फूर्त अशा सभेने अधिवेशनाची सुरवात झाली. सभेस संघटनेचे अखिल भारतीय राज्य महासचिव कॉ. बी. वेंकट तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केले.
सभा संभेनंतर रीतसर युनियनच्या अधिवेशनास सुरुवात झाली. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनात संपूर्ण राज्यातील शेतमजूरांच्या प्रश्नावर सखोल अशी चर्चा होऊन पुढील तीन वर्षासाठी संघटनेचे कार्य चालवण्यासाठी ३९ लोकांची नवीन राज्य कमिटीची निवड यावेळी करण्यात आली. संघटनेचे राज्य सचिव म्हणून जालना जिल्ह्याचे कॉ. मारोती खंदारे, राज्य अध्यक्ष म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे कॉ. नत्थूभाऊ साळवे, कोषाध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचे कॉ. बळीराम भुंबे, राज्याचे सहसचिव म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे कॉ. सुदाम ठाकरे यांच्यासह आपल्या जिल्ह्यातून कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे यांची राज्य कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




Post a Comment
0 Comments