जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
लहान गट गिमिषा भांगरे,मध्यम मेघना नहार तर मोठा गटात हेमंत सूर्यवंशी प्रथम
कार्यक्रम धरतीआबा बिरसा मुंडा,याहा मोगी माता व डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरवात झाली.लहान गटात प्रथम गिमिषा भांगरे,द्वितीय प्रांजल पाडवी,तृतीय आराध्या पावरा.मध्यम गटात प्रथम मेघना नहार,द्वितीय ईशा भिंगारे,तृतीय अर्पिता पाडवी व आकांक्षा झेंडे तर मोठया गटात प्रथम हेमंत सूर्यवंशी,द्वितीय रविंद्र नाईक,तृतीय पल्लवी पांगारे व साहेबराव निकुंभ यांनी क्रमांक पटकावले.स्पर्धेत एकूण ८१ स्पर्धेकांना भाग घेतला.मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांना गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी बोलतांना सरकार विकासाचा नावावर आदिवासींची जमीन,जंगल हडप करत आहे.त्यामुळे आदिवासींच्या विकास दाखवून आदिवासींना विनाश करत आहे. तोरणमाळ,लोणावळा येथील त्यांनी दाखले दिले. गैरआदिवासी गैर मार्गाचा अवलंब करून बोगस प्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या नोकऱ्या हडप करत आहे. कवी कांतीलाल पाडवी म्हणाले,खरा विकास हा शिक्षणामुळे आहे.शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण झाले पाहिजे.यासाठी समाजाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.शिक्षण हा चिकित्सक वृत्तीने विचार करण्याचा मार्ग आहे.माणसाने कोणाचाही पाठमागे न धावता;विचार केला पाहिजे.तसेच,कवितेचा माध्यमातून त्यांनी विचार मांडले.
कवी साहित्यिक संतोष पावरा यांनी काही प्रस्थापित लेखकांनी आदिवासींच्या खोटा इतिहास लिहिला आहे.आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे.आदिवासी संस्कृती ही मानवी मूल्यांवर आधारित आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्याचे मूल्य आदिवासी संस्कृतीत आहे.परंतु,आज आदिवासी समाज देव,धर्म,पंथ यात गुरफटून पडला आहे;हे दुर्दैव.पावरा यांनी सुरेल आवाजात चिंतन करण्यास भाग पाडणाऱ्या कविता म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी योगेश्वर पाडवी मनोज पावरा,डॉ.पंकज पावरा,चंद्रसिंग वळवी,प्रवीण पावरा,गुलाबसिंग पाडवी,हेमंत सूर्यवंशी यांची मनोगते झाली.
कार्यक्रमासाठी बिरसा आर्मी जिल्हाध्यक्ष भरत पावरा,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,संघटक कालुसिंग पावरा,चंदू पाडवी,मगन पाडवी,स्पर्धा कमिटी अमरसिंग ठाकरे,रमेश राऊत,प्रवीण वसावे यांनी परिश्रम घेतले.यावेळी बिरसा आर्मी विभागीय अध्यक्ष विलास पावरा,कार्याध्यक्ष हिरालाल पावरा, उपाध्यक्ष प्रा.निवास वळवी, तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,जिल्हा सचिव सतीश पाडवी,रणजित पाडवी,मंगलसिंग पाटील,किसन पावरा,अशोक पाडवी,दिनेश वसावे, सुभाष पाडवी,रुपसिंग वळवी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाडवी,सूत्रसंचालन मोहन वळवी तर यशवंत वळवी यांनी आभार मानले.




Post a Comment
0 Comments