कै. कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राच्या पुढाकारातून आजोबांची यशस्वी शस्त्रक्रिया
सहायता केंद्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण
तळोद्यात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कै. कलावती पाडवी फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र हे गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. याच केंद्राच्या माध्यमातून भामट्यां वाल्या वळवी (रा. अमोनी, वय 70) या ज्येष्ठ नागरिकाला जीवनातील मोठ्या वेदनांपासून दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून पाठीवरील भली मोठी गाठ घेऊन फिरणाऱ्या वळवी आजोबांची तळोद्यातील आमदार राजेश पाडवी सेवा केंद्रात व्यथा मांडल्यानंतर उपचारासाठी तातडीची हालचाल करण्यात आली.
या प्रकरणी कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे तसेच त्यांचे सहकारी मुकेश बिरारे, अण्णा पाटील, राकेश महाले यांनी पुढाकार घेत रुग्णाला सिव्हिल सर्जन व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रोहित वसावे यांच्याकडे दाखल केले. वैद्यकीय टीमच्या सहकार्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेत मीना चव्हाण, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक रवींद्र गिरासे, माधुरी गवळी यांनी मोलाची भूमिका बजावली.
शस्त्रक्रियेनंतर आजोबांनी कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र, आमदार राजेश पाडवी व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे....

Post a Comment
0 Comments