तुळाजा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र ढोडरे होते. तर प्रमुख वक्ते भील सर व मोरे होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इ.5वी ते 7 वी. चा एक गट व इ 8 ते 10वी चा गट तयार करण्यात आले. त्यात विद्यार्थ्याचे भाषणाचा क्रमांक काढण्यात आला. व शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विलास मगरे याच्याकडून भाषणात प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देण्यात आले. व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पेन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मोरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल माहिती देत, लोकमान्य या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला तर भीलसर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोडरे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती सांगितली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी निरीक्षकांचे काम पाडवी तसेच मगरे यांनी केले. सूत्रसंचालन खेडकर यांनी केले. तर आभार राहुल साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटील, जांभोरे, राठोड भाऊसाहेब, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments