मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सिद्धिविनायक चौकात बॅनर लावण्याच्या किरकोळवादातून मोहित मदन राजपूत या युवकास बेदम मारहाण करण्यात आली. उपचारा दरम्यान मोहित राजपूत युवकाची सुरत येथे प्राणज्योत मालवली. येथे प्रकरणी दोशींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी हत्या प्रकरण जलद न्यायालयामार्फत सुनावणी करणे, पाच दिवसात आरोपी अटक न झाल्यास समस्त राजपूत समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा आला.
यासंदर्भात सोमवारी समस्त राजपूत समाजातर्फे मयत मोहित राजपूत यांच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बॅनर लावण्याच्या किरकोळवादातून झालेल्या मारहाणीमुळे मोहित राजपूत याचा मृत्यू झाला. त्याच्या पक्षात वृद्ध माता पिता दोन निरागस बालके आणि पत्नी असा परिवार उघडा पडला. आरोपींनी केलेल्या मारहाणी मुळेच मोहितला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील काही आरोपी अजून फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
नंदुरबार शहरात मागील दहा-बारा वर्षात मोठ्या प्रमाणावर संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याला आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीस प्रशासन कमी पडते की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. मागील जानेवारी महिन्यात सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्याच्या रागातून अनेकांना गुंडांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. स्व. मोहित मदन राजपूत यांना झालेली मारहाणीला सोशल मीडिया हे एक कारण होते. या मारहाणीत मोहितला डोक्यात शरीरावर इतर ठिकाणी मारहाण केल्याचे दिसत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये मारहाणीचे चित्रीकरण असून 20 ते 30 गुंडांचे टोळके दिसत आहे. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या सर्वांचे मोबाईल संभाषण चॅटिंग, मेसेज, सीडीआर पडताळणी केल्यास खरा गुन्हेगार सापडण्यास मदत होईल तसेच दाखल गुन्ह्यातील प्रमुख फरारापी राजकीय असल्याने त्याला लवकर अटक न केल्यास तपास कार्यात हस्तक्षेप करून तपासाची दिशा बदलवू शकतात तरी त्यांना तात्काळ अटक करावी ही विनंती करीत आहेत. स्वर्गीय मोहित राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा व मोहितच्या परिवाराला न्याय मिळण्यासाठी नामांकित विधी तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अशी समस्त राजपूत समाजातर्फे मागणी करण्यात आली. खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसात अटक न झाल्यास समस्त राजपूत समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येईल आरोपींना शासन करण्या सोबतच मोहित राजपूत यांच्या निरागस बालकांसाठी आवश्यक ती शासकीय मदत मिळणे बाबत निवेदनात मांडण्यात आले आहे.
या निवेदनावर मोहित राजपूत यांच्या कुटुंबातील
मोनिका मोहित पाटील, माया मदन पाटील, मदन हिरालाल राजपूत, अरविंद हिरालाल राजपूत, प्रवीण पाटील, कन्हैया पाटील, मंगलसिंग पाटील, जितू पाटील यांच्यासह राजपूत समाजातील सुमारे पावणे 200 महिला पुरुषांच्या सह्या आहेत.




Post a Comment
0 Comments