तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन; पर्यावरण पूरक फुलांच्या वर्षाव सनई चौघडाचा सुर तालात लक्षवेधी मिरवणूक
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गुलाल विरहित फुलांची उधळण करीत सनई, च्या सुरात चौघडा चा निनादात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.
या मिरवणुकीत सामाजिक , राजकीय सह सर्व क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. सजविलेल्या पालखीतून गणरायाची मिरवणूक काढली होती.
गणरायाची सजविलेल्या पालखीतून विसर्जन मिरवणुकीला स्मारक चौकातून प्रारंभ झाला. ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सुर्यवंशी यांच्या घराजवळ गणरायाची समारोप केला.
गणरायाची आरतीचा मान महिला होमगार्ड यांना दिला. विसर्जन मिरवणूक मराठी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार संघाच्या पर्यावरण गणेशोत्सव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments