Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी राजरत्न बिरारे नियुक्ती

 नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी राजरत्न बिरारे नियुक्ती

             शिवसेनेचे युवा शिवसैनिक राजरत्न बिरारे यांची नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

       शहादा तालुक्यात समता युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी समाज कार्य करणारे व शिवसेनेचे कार्य जोमाने करणारे युवा कार्यकर्ते राजरत्न बिरारे यांच्या कामाची दखल घेत  शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा उप प्रमुख पदी नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार जिल्हा प्रमुख राम भैय्या रघुवंशी व शिवसेना नंदुरबार जिल्हा युवा सेनेचे प्रमुख मोहितसिंग राजपुत यांच्या सहीचे नियुक्ती पत्र तळोदा येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमस्या पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख  गणेश पराडके, शिवसेना जिल्हा जिल्हा सह संपर्क प्रमुख  लक्ष्मण वाडीले,जिल्हा उप प्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, शहादा तालुका प्रमुख  मनलेश जायसवाल,महिला आघाडी समन्वयक सौ.सरिताताई माळी, महिला संपर्क प्रमुख सौ.कविताताई चौधरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.ज्योती ताई राजपुत यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा येथे महिला मेळाव्या प्रसंगी पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी शहादा तालुक्यातील  जयसिंग ठाकरे,  विजय गायकवाड, मनोज पाथरवट,  गणेश महाजन,  लक्ष्मण पवार,  गोपाल पावरा,  एकनाथ ठाकरे, रणजीत शेमले,  कांतीलाल धनगर सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments