हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
नंदुरबार - 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळ साहित्य वाटप करण्यात आले. सचिव रो.राहुल पाटील यांनी या वेळी उपस्थितांना रोटरी च्या बाबतीत सखोल माहिती देत व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक वळवी सर रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले



Post a Comment
0 Comments