शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी
तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे शेतात बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. पोळा सण अवघ्या काही दिवसावर ही दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रमेश बोला पावरा हे शेतात काम करत असताना त्यांच्या बैलाला सर्पदंश झाला. त्यांनी तातडीने बैलाला घरी आणून तळोदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश गावित यांना संपर्क करून बोलावून तपासणी केली. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच बैलाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकत्यांचा मित्र शेती कामे बैल जोडी वर अवलंबून असतात. पावसाळ्याच्या खरीप हंगामातच असा अपघात घडल्याने पावरा यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेमुळे त्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या वेळी गावातील सरपंच सपना दारासिंग वसावे, सेवाभावी राजकुमार पाडवी, दारा वसावे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments