स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी - अविनाश जोशी
नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय... वंदे मातरमचा जयघोष करीत तिरंगा हातात घेऊन जुलमी इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या छातीवर झेलणारे व
अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1942 ला प्राणांची आहुती देऊन लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार आणि बालवीरांची भूमी म्हणजे नंदनगरी. वीर शौर्याची गाथा सांगणारी भागवत कथा आणि श्रवण करणारे भाग्यवंत म्हणजे नंदुरबारचे भक्तगण. असे भावपूर्ण प्रतिपादन भागवताचार्य अविनाश जोशी महाराज यांनी केले.
नंदुरबार येथील श्री मोठा मारुती श्रीराम मंदिर संस्थांच्या सभागृहात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेचे निरूपण भागवताचार्य वेदमुर्ती अविनाश जोशी महाराज करीत आहेत.
कथेच्या तिसऱ्या दिवशी एरंडोल जिल्ह्यातील वीर जवान ज्ञानेश्वर पाटील यांच्या वीर धर्मपत्नी माधुरीताई पाटील या उपस्थित होत्या.
याप्रसंगी पुढे बोलताना अविनाश जोशी महाराज म्हणाले की, माणसाला आजार विरहित मरण यावे. म्हणून श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करणे महत्त्वाचे ठरते. भगवंताच्या नामस्मरणाने मानवी आयुष्य सार्थक होण्यास मदत होते. असेही जोशी म्हणाले.
श्रावण मास निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेत नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील माजी सैनिक, देशासाठी वीरमरण प्राप्त झालेले जवानांच्या परिवारातील सदस्य यांची उपस्थिती लाभणार आहे.संगीतमय भागवत कथेला तबला वादन मुकेश पडोळे,हार्मोनियम आनंदा बेंद्रे, ऑर्गन सोहम बनसोडे, गायन अनिरुद्ध जोशी तसेच पौरोहित्य विलास जोशी करीत आहेत.



Post a Comment
0 Comments