एस.ए.एम. इंग्लिश मीडियम स्कूलात विद्यार्थी परिषद गठीत
तळोदा येथील एस .ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कल्याणी महाजन व सामाजिक कार्यकर्ते मोबीन भाई मणियार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे डॉक्टर कल्याणी महाजन व मोबीन भाई मनियार यांच्या स्वागत केले.
यानंतर शाळेत घटित झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय नेतृत्व व त्यांची कार्य याबाबत शपथ देण्यात आली. शाळेचा हेड बॉय म्हणून प्रीत देवेंद्र सोनगडवाला तर हेड गर्ल म्हणून नुपूर मुकेश वाणी या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. ब्लू हाऊस कॅप्टन म्हणून आयुष अरुण महाजन व तनुश्री किरण सूर्यवंशी तर व्हाईस कॅप्टन म्हणून आर्यन सुधीर ठाकरे व नहिमा शहाजानआलम मोडल यांनी शपथ घेतली.
ग्रीन हाऊस कॅप्टन म्हणून तन्मय नरेंद्र राणे व वैष्णवी विजय शिंदे तर व्हाईस कॅप्टन म्हणून यांनी शपथ घेतली
रेड हाऊस कॅप्टन म्हणून शैलेंद्र सागर व यज्ञा दीपक सूर्यवंशी व्हाईस कॅप्टन म्हणून भावेश दौलत वाडिले व वेदश्री हेमंत चौधरी यांनी शपथ घेतली. हॅलो हाऊस कॅप्टन म्हणून चिराग चंद्रशेखर सूर्यवंशी व तेजल अमृत महाले तसेच व्हाईस कॅप्टन म्हणून अभिषेक सुनील निकम व साक्षी अविनाश बागुल यांच्या शपथविधी झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर कल्याणी महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थीदशेत नेतृत्व गुण व आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय, आपल्या सहकाऱ्यांना नेहमी मदत करावी तसेच शालेय जीवनात सोपवलेली जबाबदारी पार पाडत असताना पुढाकार घेऊन कार्य पार पाडावे असे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी विद्यार्थी नेतृत्व व जबाबदार व्यक्ती हे पुढील आयुष्यात देखील समाजासाठी, देशासाठी चांगले कार्यकर्ते होत असतात असे प्रतिपादन केले.
यावेळी इंग्लिश मॅरेथॉन व इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये राज्यात टॉपर आलेल्या नक्ष अमोल हिवरे या विद्यार्थ्याचे एक हजार रुपयांच्या धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इ. 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाडवी यांनी तर प्रार्थना ममता पाडवी यांनी केले

Post a Comment
0 Comments