नवोदय विद्यालयात आदिवासी गौरव दिवस व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात रक्षाबंधन व विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम आदिवासी गौरव दिना निमित्ताने आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी. एम. मस्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वरिष्ठ शिक्षक विलास पाटील, संजय पाचोरे, सुनिल लोहार आदीं उपस्थित होते. यावेळी प्राचार्य जी.एम.मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आदिवासी गौरव दिनाचे महत्व विषद करत आदिवासी समाजाचा इतिहास, वैभवशाली परंपरा, संस्कृती आणि गौरवशाली वारसा याबद्दल सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि हक्क या प्रती सजग रहावे असे सांगितले. यावेळी संजय पाचोरे, धैर्यशील जगदाळे, आशिष शर्मा यांनी ही आदिवासी दिना निमित्ताने मार्गदर्शन केले. तसेच वेदांत, सर्वज्ञ, प्रेमकुमार, या विद्यार्थ्यांनी अभ्यास पुर्ण भाषणे दिलीत. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी बोलीभाषेतील पारंपारिक गीतांवर पारंपारिक पोशाख परिधान करुन नृत्य सादर करुन नवोदय विद्यालयाच्या वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्याच प्रमाणे रक्षाबंधन ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. विद्यालयात शिकत असलेल्या सख्ख्या भावंडांना मंचावर बोलावून बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला चैतन्यपुर्ण वातावरणात राखी बांधली. सोबतच विद्यालयातील सर्व विद्यार्थींनींनी आपल्या वर्गातील व कनिष्ठ तसेच वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना राखी बांधुन कौटुंबिक वातावरण तयार केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अकरावीचे विद्यार्थी जयेंद्र पावरा, दिशांत वळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद कुलकर्णी, सतीशकुमार, लालागिर गोस्वामी, शंकर यादव, अशोक शेखावत, अनिल ठाकरे, निर्मला, अर्चना खैरनार, पायल पटेल या शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments